राजापूरजवळील मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील नव्या पुलाचे काम अंतिम टप्प्याकडे
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत राजापूर येथे अर्जुना नदीवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा पुल मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक उंचीचा पुल असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडावूनमुळे या पुलाचे काम मध्यंतरी रेंगाळले होते. आता मात्र या पुलाच्या कामाला वेग आला असून सध्या या पुलावर गर्डरसह मोठे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. हा पुल ३६ मीटर उंच व ३०० मीटर लांब असून या पुलामुळे अनेक वळणे काढून टाकण्यात आल्याने ७०० ते ८०० मीटरचे अंतरही कमी होणार आहे.
www.konkantoday.com