महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टलॅब सुरू करण्याचे मुंबई हायकोर्टाचे सरकारला निदेॅश
रत्नागिरीतील कोरोना टेस्टलॅबच्या संदर्भात रत्नागिरीतील नागरिक खलिल वस्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वस्ता यांच्यावतीने रत्नागिरीचे ऍड. राकेश भाटकर यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता उच्च न्यायालयाने राज्य शासनाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना टेस्टलॅब सुरू करा, आयसीएमआरच्या गाईडलाईननुसार ही लॅब असली पाहिजे असे आदेश दिले. राज्यात अजूनही १२ जिल्ह्यात टेस्टलॅब नाही असेही कोर्टाने नमुद केले. यावेळी ऍड. भाटकर यांनी कोर्टासमोर रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यातही लॅबची गरज असल्याचे कोर्टासमोर मांडले होते. त्याची दखल घेवून कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
www.konkantoday.com