
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी १६ व १७ जुन राेजी चर्चा करणार
सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर देश अनलॉक करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली असतानाच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे गंभीर आव्हान आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, देश अनलॉक करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.काही राज्याशी१६जून व १७ जून रोजी नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील.
www.konkantoday.com