जिल्हा रूग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांची भरती तातडीने करा, कास्ट्राईब संघटनेची मागणी
सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय रूग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. गेली अनेक वर्षे जिल्हा शासकीय रूग्णालयातील चतुर्थश्रेणी वर्गातील कर्मचार्यांची पदे रिकामी आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध ठिकाणी हंगामी कक्ष निर्माण केले जात आहेत. त्या कक्षातील कामकाजाची जबाबदारीही चतुर्थश्रेणी कर्मचार्यांवर सोपविण्यात आल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. यासाठी रिकामी असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत असे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. महासंघाचे अध्यक्ष वासुदेव वाघे, उपाध्यक्ष दिनकर कांबळे, कोषाध्यक्ष चंद्रकांत सागवेकर, सरचिटणीस विजय जाधव आदींनी याबाबतची मागणी ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com