सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लावतो असे सांगून एक लाख पंधरा हजार रूपयांना गंडा
सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लावतो असे सांगून एक लाख पंधरा हजार रूपयांना गंडा घालणारी टोळी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पकडली आहे. .पानवल येथील शंकर नारायण लिंगायत यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. साईप्रसाद प्रमोद विलणकर याने शंकर लिंगायत यांच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला लावतो असे सांगून त्यांच्याकडून १लाख १५हजार रूपये घेतले. सात-आठ महिने उलटले तरी नोकरीचा पत्ता नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शंकर लिंगायत यांच्या लक्षात आले त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यामध्ये साईप्रसाद विलणकर,पूजा विलणकर,भाग्यश्री उर्फ वैशाली दर्डे उर्फ नेहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी साईप्रसाद विलणकर, साईराज मोरे उर्फ वेंद्रे, अनोफ अहमद झारी, धीरज खलसे नेहा आखाडे आणि राजकुमार तोडणकर यांना अटक करण्यात आली आहे.
बनावट नियुक्ती पत्र आणि सेवापुस्तिका
आरोपी साईप्रसाद विलणकर याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे बनावट नियुक्तीपत्र आणि सेवापुस्तीका सापडली आहे. दाेन आराेपी फरार आहेत
www.konkantoday.com