शाळा सुरू होण्यास वेळ असला तरी जिल्ह्यासाठीची पाठ्यपुस्तके रत्नागिरीत दाखल
कोरोनाच्यामुळे सध्या शाळा कधी सुरू करायच्या याबाबत अजूनही राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे इतर वेळी जसे शैक्षणिक वर्ष सुरू होत होते तसे यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होणार नाही, त्याची सुरूवात लांबणीवर पडणार आहे. तरी देखील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. दरवर्षी प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी शासन मोफत पुस्तके वाटप करते. रत्नागिरी जिल्ह्यात अंदाजे पावणे सात लाख विविध विषयांची पुस्तके लागतात. यापैकी ९० टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. तसेच दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तके आणि युनिफॉर्म दिला जातो. यंदाही तो दिला जाणार असून यासाठी शिक्षण विभाग सध्या सज्ज झाला आहे.
www.konkantoday.com