राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांचे काही कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मुंबईत मंत्रालयाच्या समोर असलेल्या मंत्र्यांच्या बंगला परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या बंगला परिसरातील कर्मचारी वस्ती असलेल्या भागातही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये मुंडेंच्या स्वयंपाकी, मदतनीस यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button