
रत्नागिरी शहरात पहिल्याच पावसात रस्त्याची तळी झाली
संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरातील ठिक ठिकाणी रस्त्यांवर पाणी भरले. बाजारपेठेतील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने वाटचाल करावी लागत होती.रत्नागिरी नगर परिषदेने मात्र शहरातील गटारे व नाले पावसापूर्वी साफ केल्याचा दावा नुकताच केला होता.
www.konkantoday.com