रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 15 रुग्ण बरे झाले,नवीन 2 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी –उपचारानंतर बरे झालेल्या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले.  त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 259 झाली.  आज दोन रुग्णांची अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 392 झाली. 15 जण मृत असून आता ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 118 आहे.
            रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.5 टक्के आहे.  आज समाजकल्याण रत्नागिरीतून 8, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीतून 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड येथून 3 आणि साडवली येथून 2 रुग्ण बरे होवून घरी परतले. 
            आज पॉझिटिव्ह आलेल्या 2 अहवालातील 2 रुग्ण कळंबणी येथील आहेत.
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
            जिल्ह्यात सध्या 67 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 9 गावांमध्ये,  गुहागर तालुक्यामध्ये                      5 गावांमध्ये, खेड तालुक्यात 06 गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात 08 गावांमध्ये,  दापोली मध्ये 9 गावांमध्ये,लांजा तालुक्यात 6 गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात 14  गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात 10 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
 
संस्थात्मक विलगीकरण
            संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी –  36, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी –  14, उपजिल्हा रुग्णालय कामथे – 3, उपजिल्हा रुग्णालय कळबणी -3, कोव्हीड केअर सेंटर घरडा इन्स्टीटयुट, लवेल, खेड –  12, ग्रामीण रुग्णालय गुहागर- 2,   कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – 13, कोव्हीड केअर सेंटर साडवली संगमेश्वर -3  असे एकूण 86 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.  
होम क्वारंटाईनची संख्या 3000 ने कमी झाली
          मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून  आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 51 हजार 883   इतकी आहे.
 
आत्तापर्यंत 6 हजारांहून अधिक अहवाल निगेटिव्ह
            जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 7 हजार 249 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 922 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 390 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 6 हजार 512 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 327 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 327 प्रलंबित अहवालमध्ये 4 अहवाल कोल्हापूर येथे, 221 अहवाल मिरज आणि 102 अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.  
            परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि.  11 जुन 2020 अखेर एकूण 1 लाख 31 हजार 802 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 58 हजार 500 आहे. यामध्ये रेल्वेने इतर राज्यात अथवा जिल्हयात गेलेल्यांची संख्या 10 हजार 289 आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button