
मुंबई पोलिस चौपाटी परिसरात नागरीकांच्या सुरक्षेसाठी सेगवेच्या सहाय्याने गस्त घालणार
मुंबई पोलिस विभागासाठी उपयुक्त अशा सेल्फ बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजेच सेगवेचं उद्घाटन गुरूवारी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते मरीन ड्राईव्ह येथे पार पडलं. यावेळी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे पोलिस दल दलाचे आत्याधुनिकीकरणाचे काम राज्य सरकारच्या वतीने हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत चौपाटी परिसरात नागरीकांच्या सुरक्षेसाठी सेगवेच्या सहाय्याने गस्त घालण्यात येणार आहे. दरम्यान त्याचंच उद्घाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
www.konkantoday.com
