
मालवण शहरातील प्रस्तावित फिश एक्वारियमसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर
मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या माध्यमातून मालवण शहर पर्यटन विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. मालवण शहरातील प्रस्तावित फिश एक्वारियमसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्यात ५ कोटी निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. . याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.
मालवण शहर पर्यटन दृष्ट्या गतिमानरित्या विकसित होत आहे. दरवर्षी लाखो पर्यटक मालवणला देतात. स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग व अन्य जल पर्यटनाचा आनंद लुटला जातो. समुद्रात माशांच्या विविध प्रजाती असून यातील प्रजाती प्रत्यक्ष पाहता याव्यात अशी अनेक पर्यटकांची इच्छा असते. पर्यटकांची ही मागणी लक्षात घेता मालवण शहरात पर्यटनाचे नवे केंद्र निर्माण करून पर्यटन वाढ व्हावी यासाठी मालवण पालिकेचे प्रयत्न सुरू होते.शहरात अद्ययावत फिश एक्वारियम उभारावे यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शासन स्तरावर निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू होते.
www.konkantoday.com