
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने जिल्हयात अंदाजे १३० कोटींचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने दापोली व मंडणगड तालुका उद्ध्वस्त झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४०हजार कच्च्या व पक्क्या घरांचे नुकसान जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील घरांची संख्या सर्वाधिक आहे. बागायतीच्या नुकसानीचा आकडा सात हजार हेक्टर आहे. प्रशासनाकडून वेगाने पंचनामे सुरू आहेत. १० जूनपर्यंत झालेल्या पंचनाम्यात सुमारे १३० कोटींच्या नुकसानीची नोंद झाली असून अद्यापही पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढणार आहे.
www.konkantoday.com