
तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या,याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत’-नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी १४ जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे.
‘कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे.अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, अशा बातम्या ऐकून मला आनंद आणि अभिमान वाटत राहायचा’ अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
www.konkantoday.com