
ठाकरे सरकारविरोधात आज मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन
राज्यातील महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात आज मनसे रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारला जागे करण्यासाठी हॉर्न वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आधीच संकट ओढवले आहे. वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहीऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेलं राज्य सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी हे आंदोलन आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली.
शुक्रवार १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न वाजवणार आहे. ‘फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन’ हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारे आंदोलन असेल, असे संजय नाईक म्हणाले
www.konkantoday.com