चिपळूण तालुक्यातील बचतगटांनी १ लाख ३० हजार मास्क तयार करून केली मोठी आर्थिक उलाढाल

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडावून झाल्याने अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र चिपळुणात महिला बचतगटानी या काळात देखील न डगमगता आपला उत्पन्नाचा मार्ग शोधून काढला. या बचतगटांनी मास्कचा व्यवसाय करण्याचे ठरवले. यासाठी आवश्यक असणार्‍या कापड खरेदीसाठी त्यांनी शासनाच्या उपजिविका निधीतून कर्ज घेतले आणि मास्क तयार करण्यास सुरूवात केली. चिपळूण तालुक्यातील महिला समुहाने १ लाख ३० हजार मास्क तयार केले. व त्यातून २० लाखांची उलाढाल केली. तयार केलेले मास्क जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायती, कंपन्या आदींना मागणीनुसार पुरवण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button