कोरोना केअर सेंटरला काम करणारा कर्मचारीच कोरोनाबाधित
कोरोना केअर सेंटरला काम करणारा कर्मचारीच कोरोनाबाधित झाला आहे. यामुळे देवरूख शहरात पहिला पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण मिळून आला आहे. त्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. शहरातील दत्तनगर येथे राहणारा हा कोरोना बाधित रुग्ण आहे. आजपर्यंत शहरात एकही रुग्ण सापडला नव्हता. यामुळे शहरातील नागरिक बिनदिक्कतपणे वावरत होते. शहरातील पहिला रुग्ण हा सर्वसामान्य नागरिक अथवा मोठ्या शहरातून आलेला नाही. हा रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या सहवासात सर्व खबरदारी घेऊन काम करणारा आरोग्य कर्मचारी आहे.
संगमेश्वर आयटीआय कोरोना सेंटरला काम करणारा हा कर्मचारी आहे. या कर्मचार्याला चार दिवसांपूर्वी ताप येत होता.
www.konkantoday.com