
शेवटी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेचे प्रशासनाने केले अंत्यसंस्कार
कोरोनाची धास्ती जनतेने एवढी घेतली आहे की आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबातील लोकांनी नकार दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला असून सदर महिलेचे कोरोनामुळे निधन झाले होते. मात्र तिच्या नातेवाईकांनी म्हणजे तिचा पती व मुलगा आदी जवळच्या लोकांनीही मृतदेह ताब्यात घेतला नाही. तसेच गावानेही हा मृतदेह गावात आणण्यास विरोध केला. नातेवाईक व ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराला विरोध केल्याने शेवटी प्रशासनाने पुढाकार घेवून या महिलेवर अन्य ठिकाणी अंत्यसंस्कार केले. कोरोनाने केवळ माणसांच्यात अंतर निर्माण केले नाही तर माणुसकीतही अंतर निर्माण केले असल्याचे आता या प्रसंगातून दिसत आहे.
www.konkantoday.com