
लांजा एसटी स्थानकासमोर अनोळखी तरूणाचा मृतदेह सापडला
लांजा बस स्थानकासमोरील गुरूप्रसाद स्वीटमार्ट जवळ एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह सकाळी आढळून आला. याबाबत लांजा नगरपंचायतीचे कर्मचारी कांबळी यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सदरचा तरूण गेले चार दिवस मद्यप्राशन करून लांजा शहरात फिरत होता. त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com