
राज्यात काल १८७९ कोरोनाबाधित रुग्ण यशस्वी उपचारांनंतर घरी
देशात एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरु असताना दुसरीकडे चांगली बातमी राज्यातुन समोर येत आहे. कारण राज्यात बुधवारी १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. काल कोरोनाच्या३२५४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ९४ हजार ०४१ इतका झाला आहे. पैकी सध्या ४६ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
www.konkantoday.com