
आता मोबाईल चोरट्यांची मजल वाढली, कार्यालयातून महसूल कर्मचाऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवला
आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात पोहोचले आहेत. बुधवारी रात्री नियंत्रण कक्षातील तुषार ईश्वर चंदनशिवे या महसूल कर्मचाऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवला. ज्या इमारतीला पोलिसांचे 24 तास संरक्षण असते त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून रात्री चोरट्याने मोबाईल लांबवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.महसूल कर्मचारी तुषार ईश्वर चंदनशिवे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षात ड्युटीला होते. हा कक्ष 24 तास खुला असतो. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने नियंत्रण कक्षातील सुमारे 7 हजार रुपये किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल लांबवला. तुषार चंदनशिवे यांनी याबाबतची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संविधान कायदा 2023 चे 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.