पवारांना कदाचित माझ्या खांद्यावरून बांद्र्याच्या सिनीयरवर व बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची असेल -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कदाचित माझ्या खांद्यावरून बांद्र्याच्या सिनीयरवर व बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे. म्हणून काहीतरी करा असे सांगायचे असेल असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचेवर हाणला आहे. पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. जर माझे वडील असते तर ते त्या वयाचे असते. शेवटी प्रत्येक बापाला हेच वाटते की आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजते. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तीच भावना असते, पवार हे कदाचित या भावनेतून बोलले असावेत असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. शरद पवारांचे जे म्हणणे आहे ते मी ऐकले आहे. मी विदर्भातला आहे. समुद्राची पाहणी करायला चाललो आहे. मात्र मी अनेकदा बारामतीत गेलो आहे. तेथेही मला समुद्र दिसला नाही असेही फडणवीस म्हणाले.
www.konkantoday.com