
निसर्ग वादळाचा जिल्हा परिषदेच्या ९ तालुक्यातील शाळांना सव्वा दोन कोटींचा फटका
निसर्ग वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा दिला. दापोली तालुक्यातील अनेक गावे अक्षरशः उदध्वस्त झाली. निसर्ग वादळाचा फटका रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींनाही बसला आहे. यामध्ये जिल्ह्यातील २५९ शाळांचा समावेश असून या शाळांचे अंदाजे २ कोटी २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मात्र या अनेक शाळांवरील पत्रे व कौले उडून गेली आहेत तर काही शाळांच्या भिंती कोसळल्या आहेत. चक्रीवादळामुळे शाळेतील शैक्षणिक व डिजिटल वर्गाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आता ऐन पावसाच्या तोंडावर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला तर जिल्हा परिषदेला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
www.konkantoday.com