तिरुमला तिरुपती देवस्थान आजपासून भक्तांसाठी खुले
लॉकडाउननंतर सोमवारी पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आलं. मंदिर सोमवारपासून तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आलं होतं. यादरम्यान व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय करता येईल याची पाहणी केल्यानंतर ११जूनला म्हणजे आजपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात येणार आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान करोना व्हायरसच्या संकटामुळे २० मार्चपासून बंद होते. सोमवारी हे मंदिर पहिल्यांदा उघडले आणि पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल २५ लाख ७० हजार रुपये दान केले. पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते.
www.konkantoday.com