एसटीने आता, मालवाहतूकीकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला
राज्यात २२ मार्च पासून लाॅकडाऊन असल्याने राज्यातील प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामूळे एसटीचे उत्पन्न घटले आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने आता, मालवाहतूकीकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३१ विभागांमध्ये १० वर्षांचे आयुर्माण झालेल्या आणि ६.५०लाख किलोमीटर धावलेल्या बसचे प्रत्येकी १०प्रवासी वाहनांचे मालवाहतूकीमध्ये रुपांतरीत करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहे.
राज्यातील प्रत्येक विभागामध्ये जास्तीत जास्त १० गाड्या मालवाहतूकीसाठी तयार करण्याचे आदेश एसटी महामंडळाने राज्यातील विभागीय नियंत्रकांना दिले आहे .यामध्ये प्रमाख्याने १० वर्ष झालेल्या आणि ६.५० लाख किलोमीटर धावलेल्या एसटीची मालवाहतूकीमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे
www.konkantoday.com