लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेक गोष्टींवरील निर्बंध उठलेले असताना नाभिक समाजावरच अन्याय का ?

0
304

राज्य सरकारने आता अनेक व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सलून व्यवसाय सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही. याच मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खोचक शब्दात टीका केली आहे. “लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेक गोष्टींवरील निर्बंध उठलेले असताना नाभिक समाजावरच अन्याय का केला जात आहे. माननीय मुख्यमंत्री रोजच अगदी टापटीप दिसतात. ते केस कुठं कापतात, दाढी कुठं करतात हा प्रश्नच आहे,” अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली आहे. कोकणला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणी दौऱ्यावर असणाऱ्या लाड यांनी मंगळवारी गुहागरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here