शासनाच्या आकसाच्या धोरणाविरोधात रत्नागिरी सलून व्यावसायिक संघटनेकडून निदर्शने
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठा चालू असताना रत्नागिरीत मात्र केवळ सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आल्याचे या व्यवसायिकांकडून सांगितले जात आहे. शासनाच्या या आकसाच्या धोरणाविरोधात रत्नागिरी सलून व्यवसायिक संघटनेने आज तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. त्या निर्देशानुसार सलून व्यवसायिकांनीही गेले ३महिने आपले व्यवसाय रत्नागिरीत बंद ठेवले. दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन केले.
मात्र अडीच महिन्यानंतर प्रशासनस्तरावरून सलून दुकाने चालू करण्यास संमती देण्यात आली. त्यामुळे सर्व व्यवसायिकांना निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीत मोठा दिलासा मिळाला होता. अशावेळी १२ दिवसांनतर रत्नागिरीतील सर्व सलून दुकाने पुन्हा बंद करण्याचा फतवा प्रशासनस्तरावरून निघाल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी सांगितले
३० जूनपर्यंत बंद चे आदेश केले. मात्र अशावेळी सर्व बाजारपेठा चालू आणि सलून बंद अशी अवस्था उभी आहे. कोरोनाचा विचार केला तर आजपर्यंत कोणत्याही सलूनमुळे कोराना झालेला नसल्याचे बावा चव्हाण यांचे म्हणणे आहे. मग सलून व्यवसायिकांवर एवढा आकस का? असा सवाल त्यांनी केला.
आज रत्नागिरीत केलेल्या निदर्शनावेळी श्रीकृष्ण (बावा)चव्हाण यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष- प्रकाश हातखंबकर ,शहराध्यक्ष- बाळकृष्ण चव्हाण, खजिनदार- नितीन जाधव, परिमल खेडेकर, प्रशांत भोसले, निलेश चव्हाण, अशोक माने, मंदार पवार, साईप्रसाद चव्हाण, रोहित चव्हाण,महेश माने, यश यादव, राजा दळवी, प्रमोद दळवी, संदेश माने, संदीप चव्हाण, विकास चव्हाण, अविनाश भोसले, मंदार चव्हाण आदी उपस्थित होते.
सलून व्यवसायिकांनी भाव वाढविल्याच्या बातम्या वाचनात येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भाव दुप्पट केले (२००रु. वगैरे) ही बाब आम्हाला अवगत नसल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. जे राज्य संघटनेने भावपत्रक दिलेले आहे, त्यानुसारच सलून व्यवसायिक दर आकारत असल्याचे स्पष्टीकरण अध्यक्ष बावा चव्हाण यांनी दिले आहे.
www.konkantoday.com