वादळामुळे बाधित ४लाख २१ हजार वीज ग्राहकांपैकी ३ लाख ७६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु
रत्नागिरी जिल्हयात वादळामुळे बाधित ४लाख २१ हजार वीज ग्राहकांपैकी ३ लाख ७६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले आहे.बाधित ४७वीज उपकेंद्रांपैकी ४५उपकेंद्रे सुरु करण्यात आली असून हर्णे व केळशीफाटा उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे काम तातडीने व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली, बारामतीसह यवतमाळ आदी भागातूनही अतिरिक्त पथके आणण्यात आली असून या ठिकाणी
काम युद्धपातळीवर सुरु आहे.
www.konkantoday.com