राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ९० हजार ७८७ वर पोहोचला
महाराष्ट्रात काल २ हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ९० हजार ७८७ वर पोहोचला आहे. यापैकी एकूण ४२ हजार ६३८ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४४ हजार ८४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात काल दिवसभरात १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या ३हजार २८९ वर पोहोचली आहे.
www.konkantoday.com