प्रशासनाकडून दुजाभाव, चिपळूण येथील हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर उतरणार
आम्ही सगळ्या प्रकारचे कर भरत असून देखील प्रशासन परवाना नसणार्या हातगाडीवाल्यांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागणार असल्याची प्र्रतिक्रिया चिपळूण येथील हॉटेल व्यावसायिकांनी दिलीआहे. हॉटेल व्यावसायिक, शॉप ऍक्ट, अन्नभेसळ, वजनकाटे, जीएसटी, कामगार, मेडिकल आदी परवाने काढून रितसर व्यवसाय करीत असताना हॉटेल व्यावसायिकांना नियमांच्या जोखडाखाली प्रशासन बांधत आहे. मात्र यापैकी कोणतेही परवाने नसताना हातगाडी आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणार्यांना मात्र प्रशासन मोकाट सोडून खुल्या पद्धतीने व्यवसाय करायला देत आहे. हा जर दुजाभाव थांबला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा चिपळूणमधील हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे.
www.konkantoday.com