कोकण कृषि विद्यापीठाचे निसर्ग वादळामध्ये साडेचार कोटी रुपयांचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा फटका दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बसला असून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला याचा मोठा फटका बसला असून यामुळे अंदाजे ४ कोटी ३० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी दिली. कृषि विद्यापीठाच्या अनेक प्रक्षेत्रावरील विविध झाडे उन्मळून पडली आहेत. श्रीवर्धन येथे सुपारीची बाग निसर्ग वादळाने नेस्तनाबूत केली आहे. दापोली कार्यालयातील लॅबचेही ६९ लाखांचे नुकसान झाले आहे. मातृवृक्ष असलेल्या केळीच्या बागेचेही मोठे नुकसान झाल्याने आता केळीची रोपेही मिळणे कठीण होवून बसले आहे. लाखी बागेचे ९० टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या लाखी बागेला अनेक पर्यटक भेट देत होते. रेपोली येथील २५ हेक्टरला पुरेल एवढ्या भाजी व भातबियाण्याचे पिक खराब झाले आहे. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, डॉ. अरविंद नारखेडे व डॉ. वरवडेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com