कडवई सुतारवाडी येथील कोरोनाबाधित रूग्णांचे घर व परिसर जंतुनाशक फवारणी करण्यासाठी मनसे व स्वराज्य संघटनेचा पुढाकार
संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी येथे राहणार्या मुंबईतून परतलेल्या एका कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे अहवाल आल्यानंतर त्या रूग्णाला उपचाराकरिता रूग्णालयात हलविण्यात आले मात्र तो रहात असलेला परिसर व घरात जंतुनाशक फवारणी करणे आवश्यक होते. वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागूनही कार्यवाही झाली नाही. ही गोष्ट मनसे व युवक स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्यांना कळल्यावर त्यांनी पुढाकार घेवून मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण तसेच स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश गुरव व मनसेचे संगमेश्वर जि.प. तालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले, कडवई मनसे शाखाध्यक्ष राजू नांदलस्कर, बाळा येलोंडे, विशाल शिलकर, जगदीश कडवईकर, महेश शिलकर, निलेश नाखरेकर आदींनी या रूग्णाच्या घराला व परिसराला भेट दिली. व त्या घराची व परिसराची जातीने जंतुनाशक फवारणी केली. या फवारणीसाठी मिलिंद शिंदे व राजू बोथरे या कडवईच्या व्यापार्यांनी त्यांना सहकार्य केल्याबद्दल त्यांचे त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
www.konkantoday.com