
१३ व्या वित्त आयोगाच्या निधी अद्यापही खर्च करू न शकलेल्या ग्रामपंचायतींना ताे निधी सरकारकडे परत जमा करावा लागणार
केंद्र पुरस्कृत तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चिक निधी आणि चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम त्वरीत सरकारजमा करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. यामुळे १३ वर्मा वित्त आयोगाच्या निधी अद्यापही खर्च करू न शकलेल्या ग्रामपंचायतींना आता तो सरकारकडे परत जमा करावा लागणार आहे.
राज्य सरकारकडे या परत जमा होणाऱ्या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बम -३० या होमिओपॅथिक गोळ्या खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची ९३ लाख रुपयांची रक्कम तत्काळ सरकारकडे जमा केली आहे.
www.konkantoday.com