
हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे
हॅंड सॅनिटायझरच्या रिऍक्शनला पर्याय म्हणजे वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे हाच आहे, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे; पण कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी निर्जंतुकीकरणाशिवाय दुसरा मार्ग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे हाताचे सातत्याने निर्जंतुकीकरण अनिवार्य आहे; पण गेल्या तीन महिन्यांत सतत हॅंड सॅनिटायझर वापरल्याने त्याचा दुष्परिणाम काहींच्या हातांवर जाणवू लागला आहे. अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.
www.konkantoday.com