
कोकण रेल्वेच्या कर्मचारी कल्याण संस्थेत मोठा घोटाळा ः माजी अध्यक्ष भानु तायल यांच्यासह सहाजणांविरूद्ध सीबीआयकडून गुन्हा नोंदवला
रत्नागिरी ः कोकण रेल्वे महामंडळाच्या कर्मचार्यांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या कर्मचारी कल्याण संघटनेमध्ये खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे वृत्त असून यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेत कोट्यावधी रुपयांचा घोळ झाल्याचा सीबीआयचा आरोप असून त्यादृष्टीने आता चौकशी सुरू असून सध्या कोकण रेल्वेचे माजी अध्यक्ष भानु तायल यांच्यासह सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीबीआयमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. कर्मचार्यांच्या कल्याण सोसायटीच्या माध्यमातून रत्नागिरी, माणगांव, कर्नाटक व उलवे नवी मुंबई येथे मालमत्ता खरेदी व्यवहार करण्यात आला. आता या खरेदी व्यवहारातच अनियमितता आढळून आल्याने हे व्यवहार वादात सापडण्याची शक्यता आहे. या कर्मचारी कल्याण सोसायटीसाठी २७ कोटी रुपये कोकण रेल्वे महामंडळाने दिले होते.
www.konkantoday.com