
सिंधुदुर्गात आता ट्रूनेट मशिनद्वारे कोरोना संशयितांची तपासणी सुरू
सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आता ट्रूनेट मशिनद्वारे कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ही मशिन निगेटीव्ह असलेल्या रूग्णांची माहिती देते त्यानंतर जर रूग्ण पॉझिटीव्ह असेल तर ही मशिन रिपोर्ट देत नाही. त्यामुळे ज्यांचे रिपोर्ट येत नाहीत असे रूग्ण पॉझिटीव्ह असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे नंतर स्वॅब घेवून आरटीसीटीआर मशिनद्वारे कन्फर्म करण्यात येणार आहे. ही मशिन सुरू झाल्याने सिंधुुदुर्गातील लोकांना याचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीची मशिन सध्या गोव्यात वापरण्यात येत असून त्यामुळे सरसकट सगळ्यांच्या टेस्ट घेण्याचे टळू शकणार आहे.
www.konkantoday.com