
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनचे आगमन
भारतीय उपखंडात मान्सून सामान्य गतीने पुढे सरकत आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता मिळणार आहे. शिवाय आता कृषी क्षेत्रासाठीही मान्सूनकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत.
येत्या काही दिवसात मान्सून पुढे सरकण्यासोबतच ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात १० ते १६ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.
www.konkantoday.com




