
मिर्या येथे खडकात अडकलेले जहाज बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू
चक्र्रीवादळामुळे भरकटत जावून मिर्या येथील किनार्यावर खडकात अडकलेले जहाज बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुंबई येथून डिजी शिपिंग कंपनीचे अधिकारी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. या जहाजावर १३ कर्मचारी होते. त्यांना कोरोनामुळे कुवारबांव येथे कॉरंटाईन करण्यात आले आहे. ते जहाज हलविताना त्यांना काही समस्या येवू शकतात याची आता माहिती घेण्यात येत असून जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी तसेच मुंबई येथून आलेले शिपींग कंपनीचे अधिकारी याबाबत आता लवकरच जहाजाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्याच्या दृष्टीने निर्णय घेणार आहेत.
www.konkantoday.com