
गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्रीगणेश मंदिर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील श्रीगणेश मंदिर ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानने जाहीर केला आहे. केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता आणताना ८ जूनपासून धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र राज्य शासनाने धार्मिक स्थळे सध्या सुरू करू नयेत असा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता ३० जूनपर्यंत हे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने याबाबत काही निर्णय घेतल्यानंतरच मंदिर खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
www.konkantoday.com