
मराठी भाषा त्रिसूत्री समितीचा रत्नागिरी दौरा; उपनेते बाळ माने यांनी समितीसमोर मांडली पक्षाची भूमिका
रत्नागिरी दि. ३१ ) : मराठी भाषा त्रिसूत्री समितीचा जिल्हास्तरीय दौरा सध्या सुरू असून समिती आज रत्नागिरीत दाखल झाली. आपल्या दौऱ्या दरम्यान समिती नागरिकांची मते व प्रतिक्रिया जाणून घेत आहे. या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी आज जिल्हा नियोजन सभागृहात समितीची भेट घेतली.
या वेळी बाळ माने यांनी पक्षाच्या वतीने समिती अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव आणि सदस्यांचे स्वागत केले. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका समितीसमोर स्पष्टपणे मांडत लेखी निवेदन सादर केले.
समिती अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी बाळ माने यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. तसेच मराठी भाषा त्रिसूत्री समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




