आगामी शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यास जिल्ह्यातील परिस्थिती अनुकुल नाही
आगामी शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असल्या तरी जिल्ह्यातील परिस्थिती मात्र त्यासाठी अनुकुल नसल्याचे दिसून येत आहे. जि. प.च्या २५०० शाळांपैकी जवळपास २०००शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने त्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. असे असले तरी ऑनलाईन तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून एकूण ९१६ शाळा सुरू करता येऊ शकतात. तसा अहवालही जि. प. ने शासनाकडे पाठवला आहे.
कोरोनाशी सामना करत प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू करून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या दिशेने शासनाची पावले पडू लागली आहेत. प्रत्यक्ष शाळा न भरवता ऑनलाईन धडे देण्याच्यादृष्टीने हालचाली गतिमान होऊ लागल्या असल्या तरी ग्रामीण भागातील शाळा ऑनलाईन शिक्षणाचे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे
www.konkantoday.com