
राजापूर नगरपरिषदेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम रखडल्याने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई
राजापूर नगरपरिषद इमारतीलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छता इमारतीचे काम संबंधित ठेकेदाराने वेळेत पूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.शहरातील नगरपरिषद इमारतीलगत सार्वजनिक स्वच्छता महिन्यापूर्वी स्वच्छतागृहाची इमारत कोसळून त्या जागी नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर जनतेच्या सोयीसाठी कोदवली नदीपात्रात तात्पुरत्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. त्यातच आता पावसाळा सुरू झाला तरी स्वच्छता गृहाच्या इमारतीचे काम पूर्ण झालेले नसल्याने शहरात खरेदीसाठी येणार्या नागरिकांसह व्यापारी व शहरवासियांची मोठी गैरसोय होत आहे.www.konkantoday.com