सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

लॉकडाउनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातील लेखातून सोनू सूदच्या कामगिरीला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय व्यक्त केला होता. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहेभाजपाने लॉकडाउनच्या काळात सोनू सूदचा वापरत तर केला नाही ना? असा सवाल करताना काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातूनही सोनू सूदच्या कार्याचा उल्लेख पहायला मिळेल असे मत त्यांनी मांडले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button