राज्य सरकार या गावांना आणि ग्रामस्थांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही -नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकार या गावांना आणि ग्रामस्थांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७५ कोटी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २५ कोटी रुपये तातडीची मदत म्हणून जाहीर केले आहेत, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्यातील काही गावांना भेटी देऊन श्री. शिंदे यांनी नुकसानीची पाहाणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
www.konkantoday.com