राज्य सरकारमधील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या मंत्रालयाजवळील इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण
पुनःश्च हरिओम’चा नारा देत ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू करणाऱ्या राज्य सरकारलाच धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारमधील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे वास्तव असलेल्या मंत्रालयाजवळील इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यात एका आयएएस अधिकारी आणि इतर २५ जणांचा समावेश आहे. सदर आयएएस अधिकारी कोविड टास्क फोर्समध्ये कार्यरत आहेत. तर इतर २५ जणांमध्ये या इमारतीतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काम करणाऱ्या स्वयंपाकी, घरकामगार आणि वाहन चालकांचा समावेश आहे.
www.konkantoday.com