मिर्या बंधार्याच्या दुरुस्तीचा सुमारे ९८ लाखाचा प्रस्ताव कपातीच्या फेर्यात
मिर्या बंधार्याच्या सर्व्हेनंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारे सात स्पॉट निश्चित केले. त्याच्या दुरुस्तीचा सुमारे ९८ लाखाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे या धोकादायक स्पॉटना आणखी धोका निर्माण झाला आहे. दुरुस्तीसाठी आधीच वेळकाढूपणा झाला असताना आता शासनाच्या ३३ टक्के कपातीच्या धोरणामुळे ९८ लाखाच्या निधीलाही कात्री लागणार आहे. मंत्री उदय सामंत यानी याला दुजोरा दिला तसेच तातडीची दुरुस्तीही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com