
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ५ हजार कोटींचा मदत द्यावी -रामदास आठवले
निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील शेती घरे आणि मालमत्तेचे २० हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. कोकणासोबत पुणे नाशिक आणि पालघर याभागात ही निसर्ग चक्री वादळाचा फटका बसला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने ५ हजार कोटींचा मदत निधी द्यावा तसेच तातडीने १ हजार कोटी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
www.konkantoday.com