कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येणार
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या सूचनांचे पत्र सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकार्यांना पाठविले आहेकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधीत रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. परंतु, अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.
मात्र, त्यासाठी संबंधित रुग्णांच्या घरी त्यांच्या क्वारंटाइनसाठी तसेच कुटुंबातील व्यक्तींकरिता विलगीकरणासाठी योग्य सुविधा उपलब्ध असाव्यात. घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती हवी. त्याने मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व ते सतत कार्यरत असेल याविषयी दक्ष राहावे.”
www.konkantoday.com