सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत
कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारनं देशभरात लॉकडाऊनची घोषणी केली. त्यानंतर अनेक परप्रांतीय मजूर, कामगार मुंबईत अडकून पडले होते. हातात असलेलं काम गेल्याने आणि कोरोना सारख्या महामारमुळे त्यांना मुंबईत राहणे अशक्य झालं होतं. त्यामुळे त्यांनी मिळेत त्या मार्गाने, वाहनाने किंवा पायी आपली घरची वाट धरली. मात्र हे करत असताना मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या दरम्यान अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात दिला आणि शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका संजय राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’मधून केली आहे.
www.konkantoday.com