पालकमंत्री ॲड. अनिल परब आज मंडणगड दापोली ला भेट देणार,दुपारी व्ही. सी. द्वारे मुख्यमंत्र्यांना माहिती देणार

राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब आज दिनांक 7 जून 2020 रोजी मंडणगड आणि दापोली चा दौरा करणार आहेत यावेळी सार्वजनिक बांधकाम व नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समवेत असणार आहेत.

पालकमंत्री खेड येथून सकाळी आठ वाजता मंडणगड कडे रवाना होतील. निसर्ग वादळाने झालेल्या तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते काही गावांना भेट देणार आहेत.

यानंतर ते सकाळी 10:30 वाजता दापोली येथे पोहोचणार आहेत जेथे मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी सार्वजनिक बांधकाम व नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासमवेत दापोली तालुक्यातील वादळात नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन माहिती घेणार आहेत.

यानंतर पालकमंत्री ऍड. अनिल परब आणि श्री एकनाथ शिंदे हे चिपळूण येथे साडेबारा वाजता व्ही. सी. द्वारे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना झालेल्या नुकसानीबाबत माहिती देतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button