ग्रामस्थ व चाकरमानी यांच्यातील समन्वय भविष्यातही कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा -जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी भागातून येणार्या चाकरमान्यांचे मुळ गावात सर्वांनी स्वागत करावे. ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्यातील समन्वय भविष्यातही कायम राहण्यासाठी दोघांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.
जिल्ह्यात येणार्या चाकरमान्यांना कशा प्रकारे वागणूक द्यावी यासाठी ग्रामस्थ व चाकरमानी यांच्या समन्वय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हा समन्वय साधण्यासाठी समन्वय पथकाने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले. बाहेरून येणार्यांना प्रवेशबंदी न करता सर्वांची आरोग्य तपासणी करून घ्यावी. यासाठी समन्वय पथकाने कार्यरत रहावे असाही सल्ला मुंढे यांनी यावेळी दिला.
पावस येथे समन्वय कक्षाच्या बैठकीत मुंढे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी डीवायएसपी गणेश इंगळे, पूर्णगडचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित, पावस ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती भाटकर, समन्वय पथकाचे सदस्य आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com